प्रिय सांता….सांताक्लॉज..या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी खुपच छान लेख लिहिलाय..

लाल झग्यात पांढऱ्या दाढीचा सांता येता
ख्रिसमस आनंदात साजरा करूया
झाल्या चुकांची माफी प्रभूकडे मागून
जिंगल बेल म्हणत सारे ताल धरूया..!!
प्रिय सांता….सांताक्लॉज
डिसेंबर महिना उजाडला आणि तुझी आठवण येणार नाही असे होतच नाही. आम्हा सर्वांचा लाडका आहेस तू. जेव्हा तू येतोस तेव्हा तू तुझ्या जादुई पोटलीतून आमच्यासाठी नुसते गिफ्ट घेऊन नाही येत, तू भरभरून आंनद घेऊन येतोस आमच्यासाठी. मला आठवते दरवर्षी आमच्या डोंबिवली त उत्सव नावाची जत्रा भरते.दरवर्षी तू तिथे जाऊन तेथील प्रत्येक मुलाला काहींना काही गिफ्ट देतोस. मुलांच्या चेहऱ्यावरील हसू हे त्या जत्रेतील इतर गोष्टींपेक्षा सांताक्लॉजच्या भेटीने जास्त येते. अक्षरशः तुझी वाट बघत असतात सर्व जण. तसे बघितले तर प्रत्येक मुलांसाठी त्याचा बाबा हा त्यासाठी सांताच असतो कारण न मागता सर्व हट्ट पुरवतो तो खरा सांता म्हणजेच प्रत्येकाचे बाबा.
पण सांता तरीही तुझी ओढ मात्र प्रत्येक नाताळ सणाला असतेच.
बाकी सर्व ठीक ना, , काळजी घे बरं स्वतःची
मेरी ख्रिसमस सांता….
तुझी अनु