अँक्टीव्ह मराठी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा अँक्टिव्ह मराठी न्युजचे संपादक व राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उमेशजी साठे सर यांची राहुरीला धावती भेट
अहमदनगर - शहर प्रतिनिधी - संगीता खिलारी

राहुरी शहर प्रतिनिधी नाना जोशी….
आज दिनांक 25-12-2024 रोजी वार बुधवार वेळ दुपारी 3:00 वाजता अँक्टीव्ह मराठी न्युज चॅनलचे संपादक तसेच राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेशजी साठे सर यांनी राहुरी येथील सोनाली मेडिकल येथे सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी उमेशजी साठे सर यांची राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राहुरी शहराच्या वतीने सत्कार समारंभाचा तसेच पेढे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. उमेश साठे सरांनी राहुरी शहरातील सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले नवीन वर्षाचा स्वागतासाठी आपल्याला अँक्टीव्ह न्युज मराठीचे कॅलेंडरचे प्रकाशन व ईतर विषयावर चर्चा करण्यात आले.यावेळी अँक्टीव्ह मराठी न्यूज चॅनेल मध्ये नवीन पदाधिकारी यांची निवड करुन त्यांना आयडी व नियुक्ती पत्र देण्यात आले.
हा कार्यक्रम राहुरी शहरातील नामांकित सोनाली मेडिकल येथे कार्यक्रम छान प्रकारे पेढे वाटून साजरा करण्यात आला.यावेळी सोनाली मेडिकलचे मालक भास्कर भिमराज म्हसे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबाजी साठे, रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अँक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय संपादक दत्तात्रय जोगदंड, अँक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी, अँक्टीव्ह मराठी न्युजचे राहुरी तालुका प्रतिनिधी देवेंद्र शिंदे, तालुका प्रतिनिधी प्रविण जाधव तसेच अँक्टीव्ह मराठी न्युजचे राहुरी शहर प्रतिनिधी चंद्रशेखर दिघे,शहर प्रतिनिधी सचिन कदम, राधेय जोशी,सोहम दिघे,दिपक गुलदगड, विठ्ठल शेळके, अशोक सांगळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
हा कार्यक्रम पेढे वाटून गोड पद्धतीने साजरा करण्यात आला.उमेशजी साठे यांना सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..