ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या..खासदार निलेश लंके यांची मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी - संगीता खिलारी अहिल्यानगर

सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्लभ घटकांसाठी आयोजित करण्यात येणारी विशेष शिबीरे नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी शिबिरे आयोजित करण्याचे मागणी खासदार निलेश लंके यांनी सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्लभ घटकांसाठी त्यांची कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात.

या योजना तसेच कार्यक्रम मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचनासंबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देण्याची मागणी खा. लंके यांनी केली. विविध योजनांची माहिती वीरेंद्र कुमार यांना दिली. डॉक्टर विनय कुमार यांना खा. लंके यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना संकटात त्यांनी हजारो रुग्णांना दिलेल्या जीवनाचीही मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दखल घेत हे काम देशवासीयांच्या कायम लक्षात राहील.अशी टिपणी केली.

खा. लंके यांनी केलेल्या मागणीवर कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे