आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री (APAAR)’ तयार केली जात आहे.
याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.