ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शटडाऊनमुळे नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहिल्यानगर

वीज वितरण कंपनीकडून शुक्रवारी महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती शहरासह उपनगराला एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुळानगर व विळद येथून पाणी उपसा बंद राहणार आहे.

पाणी उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव-नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, अहिल्यानगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागाला (सकाळी ११ नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास) पाणीपुरवठा होणार नाही, हा पाणीपुरवठा रविवारी होणार करण्यात येणार आहे.

रविवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, हडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागात महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा रविवारऐवजी सोमवारी होईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे