माजी.जिल्हाप्रमुख शिवसेना अप्पासाहेब जाधव यांचा रमेश आडसकर यांना जाहीर पाठींबा..
अहमदनगर - संगिता खिलारी प्रतिनिधी

अप्पासाहेब जाधव मित्र मंडळ पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली..
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याने रमेशराव आडसकर यांनी माजलगाव मतदार संघातील प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे माजी जिल्हाप्रमुख व कडवट शिवसैनिक अप्पासाहेब जाधव यांनी वैष्णवी मंगल कार्यालय येथे दुपारी अडीच वाजता मेळावा घेऊन मेळावा मध्ये जाहीर आवाहन केले.
की अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून शेतकऱ्याचे अनुदान असेल शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न असेल व गार पिट असेल या विषयी शासन दरबारी त्यांनी पाठपुरावा करून आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला या अपक्ष उमेदवार च्या पाठीमागे हाजारो शिवसैनिक च्या उपस्थितीत भव्य दिव्य असा कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर पाठिंबाचे आव्हान आप्पासाहेब जाधव माजी जिल्हाप्रमुख यांनी जाहीर केले आहे की अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहिर पाठिंबा दिला.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात रमेश आडसकर यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसुन येत आहे रमेशराव आडसकर हे हाबाडा नावाने प्रचित असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार आ.सोळंके जगताप यांना यावेळेस हाबाडा देतील असे कार्यकर्ता मेळावा मध्ये अप्पा जाधव यांनी बोलताना सांगितले आप्पासाहेब जाधव यांनी वैष्णवी मंगल कार्यालय मध्ये मित्र मंडळ कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा घेऊन पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले की मी एक शिवसैनिक व शेतकरी पुत्र असून मी अनेक आंदोलने शेतकऱ्यांसाठी केली मी पुण्यात साखर आयुक्त समोर एक झोपडी उभारून तिथे 23 दिवस आंदोलन चालल व 23 दिवस आंदोलन केलं शेतकऱ्याचा एक मुलगा मी आहे. शेतकऱ्याची कळकळ मला आहे आणि एवढेच नव्हे तर कापसावर बोंड आळी निर्माण झाली त्यावेळेस निवेदन देऊन आंदोलनेही केली हे सर्व करीत असताना माझ्यावरी काही संकट आली त्या संकटाला मात देऊन मी गप्प बसलो आणि ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मी अपक्ष उमेदवार रमेश राव आडसकर यांना पाठिंबा जाहीर केला अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकरांना विजय करा असे त्यांनी आव्हान केले आहे यावेळी हजारो कार्यकर्ते च्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला आहे.
यावेळी रमेश आडसकर अशोक डक, कडाजी जाधव , मनहोर डाके, संभाजी पास्ते , मुंजा जाधव ग्रामपंचायत सदस्य , अतुल उगले , विठ्ठल जाधव ,महादेव वैराळे , व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.