चैतन्य नारी प्रॉडक्ट्स च्या संचालिका राणी सोनवणे यांच्याशी दिलखुलास गप्पा
अहिल्यानगर

मी राणी चंद्रशेखर सोनवणे . माझे शिक्षण Bcom आणि MCM झाले आहे. माझे मिस्टर चंद्रशेखर सोनावणे यांचा बिझनेस आहे. त्यामुळे बिझनेस कसा करावा. हे मला त्याचा कडून कळाले आणि फूड मध्ये आपण काहीतरी सुरू करू की जे सर्वांच्या आरोग्यासाठी चांगले असावे. आमचा बेकरी व्यवसायाचा उद्देश हाच आहे की बेकरी प्रॉडक्ट्स मधून चांगले पदार्थ हे लोकांपर्यंत पोहोचावे. म्हणून चैतन्य नारी प्रॉडक्ट्स ची सुरुवात झाली.
आम्ही मसाले, मिलेट्स असे खाद्यपदार्थ कसे बनवायचे याचे प्रशिक्षण घेतले त्याचबरोबर बेकरी उद्योग कसा करावा याचेही प्रशिक्षण घेतले. कारण की बेकरी पदार्थ हे सर्वात जास्त खाल्ले जातात. पण यामध्ये हेल्दी कसे बनवावे याचा विचार केला. आणि बिस्किट मध्ये गव्हाचे,नाचणीचे , उपासाचेआणि मिलेट्स चे बिस्कीटे बनवले.
यामध्ये तूप सुद्धा गावरान वापरले आणि बिस्किटांची अजून पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये गुळ आणि ओटसचा वापर केला जेणेकरून हे लहान मुले व मोठ्या माणसांना खाता येतील. आणि आमच्याकडे फायबर युक्त शुगर फ्री असे डायबेटीसचे बिस्कीट सुद्धा मिळतात.
बिस्किट बरोबरच आम्ही नाचणी पीठ, राजगिरा पीठ, उपवासाची भाजणी पीठ ,थालीपीठ भाजणी पीठ असे वेगवेगळे पीठ आम्ही बनवतो.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला खूप कष्ट व महिन्यात ही घ्यावीच लागते पण हळूहळू आपल्या उत्पादनांची मार्केटिंग होते आपल्या प्रॉडक्ट मध्ये असलेला वेगळेपणा किंवा चव ही ग्राहकांना आवडली की ते आपले प्रॉडक्ट नक्की घेतात.
व्यवसाय करताना संयम ठेवणे खूप गरजेचे आहे कारण की व्यवसाय हा हळूहळू वाढतो. सुरुवातीला आम्ही आमचे प्रॉडक्ट नातेवाईक मित्रमंडळी यांना दिले, त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. आणि जर काही बदल करायचे असतील तर त्यांना विचार आणि त्यानुसार प्रोडक्शन मध्ये बदल केले . आणि त्यांनाच प्रॉडक्ट विकत दिले. आणि होलसेलर कडून हळूहळू दुकानांपर्यंत पोहोचवले.
बाहेर जे बेकरी प्रॉडक्ट्स बनवले जातात त्या प्रॉडक्ट्स पेक्षा आम्ही चांगले असे बेकरी प्रॉडक्ट्स हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत..