ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

२०२४ पासून वर्षातून दोनवेळा होणार बोर्डाची परीक्षा

११वी १२वी मध्ये शिकाव्या लागतील दोन भाषा

बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने बुधवारी नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे.

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२४ पासून इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्डाच्या परीक्षा ह्या वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. हा बदल नव्या शिक्षण धोरणानुसार केला जाईल. जेव्हा दोन वेळा परीक्षा घेतली जाईल. तेव्हा विद्यार्थ्यांना दोन्हींमध्ये आपले सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल.

शिक्षण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, दोन वेळा बोर्डाची परीक्षा घेण्याच्या प्रणालीची एनसीई आरटी कडून तयारी करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २३ ऑगस्ट रोजी शालेय़ शिक्षणासाठी नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय ११वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागणार आहेत.

नव्या शिक्षण धोरण (एनईपी) नुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांच्या घोषणेची माहिती देताना २०२४च्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके विकसित करण्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने नव्या शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीची घोषणा करण्यात आली आहे.

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील. त्यातील किमान एक भाषा ही भारतीय असावी लागेल. मंत्रालयाने वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील हेही स्पष्ट केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण मिळवण्याची परवानगी दिली जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे