पद्म पाऊल पडतेय पुढे – भारतीय पारंपारीक तथा नृत्यकला,संस्कृतीचे दर्शन घडवणारेअरंगेत्रम मुक्तांगण इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज येथील ऑडोटोरीयम मध्ये भव्यदिव्य स्वरूपात पार पडला
पुणे

भारतीय पारंपारीक तथा नृत्यकला,संस्कृतीचे दर्शन घडवणारेअरंगेत्रम मुक्तांगण इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज येथील ऑडोटोरीयम मध्ये भव्यदिव्य स्वरूपात पार पडला.
नृत्यप्रेरणा आंतरराष्ट्रीय नृत्य शाळेची विद्यार्थिनी कु. वैष्णवी दीपक रामदिन हिने तिच्या गुरू.सौ.सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनात पारंपारिक मरगम सादर केले. यात पौराणिक कथा मुद्रभिनय, कृती , हावभाव,अभिनय व ताल लय नुसार अचूक पदन्यासाच्या माध्यमातून सादर केला.
एक अप्रतिम नृत्य कलेचा आविष्कार पाहून उपस्थित प्रेक्षकांना वैष्णवीने मंत्रमुग्ध केले.तिच्या या यशस्वी नृत्य कलेला तितकीच दमदार साथ आंतर राष्ट्रीय ख्यातीच्या गायिका निधी नायर ,आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मृदंग वादक श्री पी आर चंद्रन ,व्हायोलीन वादक श्री बालसुब्रमण्यम शर्मा, बासुरी वादक श्री संजय शाशिधरण दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सौ.नृपा सोमण यांनी केले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नृत्यांगना तथा सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ सौ .सुधा कांकरिया व नेत्रतज्ञ डॉ प्रकाश कांकरीया आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतीका तुळसकर( रात्रीचा खेळ चाले सिरीयल)यांनी वैष्णवीच्या नृत्य कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले .
व अनेक भेट वस्तू देऊन तिला भावी यशस्वी नृत्यकला निपुन वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर आई वडील व भाऊ म्हणून वैष्णवीस नृत्य कला पारंगत होण्या करीता जे प्रोत्साहन दिले ते निश्चितच कौतुकास्पद होते म्हणून दीपक रामदिन ,सौ. सुवर्णा रामदिन व चैतन्य यांचे प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी पुण्यातील तथा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील मान्यवर रसिक उपस्थीत होते . कार्यक्रमाची सांगता झाल्या. नंतर मार्कंडेय बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री जगन्नाथराव बिंगेवार यांनी नृत्यांगना वैष्णवीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पल्लवी रबर प्रा . लि.चे सिइओ श्री रामचंद्र आडेपवार सहकुटुंब उपस्थित राहून वैष्णवीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
तियांशी ट्रॅव्हल्स, पुणेचे प्रमुख तथा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री अरुण अमृतवाड व पद्मशाली प्रतिष्ठान पुणेचे संचालक नि पद्मशाली कल्याण समिती, काबरा नगर परिसर ,नांदेडचे उपाध्यक्ष श्री दिलीप मादास यांनी वैष्णवीचे अभिनंदन करून वैश्विक कीर्ती प्राप्ती करीता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली.