पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला हा आदेश

पतीच्या मृत्यूनंतरच पत्नीला त्याच्या मालमत्तेत पत्नीचे मालमत्ता अधिकार हक्क मिळतील.1956 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, पत्नीला वडिलांपासून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या माहिती वरून जेव्हा जेव्हा अनेक लोक कोणतीही मालमत्ता खरेदी करतात तेव्हा ते त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणी करतात. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्क आणि त्यासोबत इतर लाभांमध्येही सूट मिळते. (Property rights)
परंतु कायद्यानुसार त्या मालमत्तेवर मालकी हक्क कोण सांगू शकतो याची पुरेशी माहिती या लोकांकडे नाही. उच्च न्यायालयात प्रलंबित अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आला असून, त्यानुसार पत्नीच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता मानली जाणार आहे.मिळालेली मालमत्तेत मुलाइतकाच हिस्सा मिळतो.
पत्नीकडे उत्पन्नाचा स्वतंत्र स्रोत नाही
अलाहाबाद हायकोर्टाने संपत्तीच्या वादावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, गृहिणीच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता आहे, कारण पत्नीकडे उत्पन्नाचा कोणताही स्वतंत्र स्रोत नाही. ही सर्व परिस्थिती पाहता, न्यायालयाने सांगितले की, हिंदू धर्मात पती सहसा पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात.
कारण सामान्यतः कुटुंबाच्या हितासाठी, पती आपल्या पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो, जिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्वतंत्र साधन नसते.