अहमदनगर महानगरपालिका साफसफाई कर्मचारी यांचा सत्कार व कौतुक सोहळा खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते..
अहमदनगर

अहमदनगर महानगरपालिकेच्या सफाई कामगार बांधव व भगिनींनी ज्या समर्पणाने आणि निष्ठेने आपल्या शहराची स्वच्छता कायम ठेवली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान केला. आपल्या रस्त्यांपासून ते गटारांपर्यंत, मोकळ्या जागांपासून ते चेंबरांपर्यंत सफाई कामगारांनी आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे.
खासदार श्री. निलेशजी लंके यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून २ ऑक्टोबर २०२४ रोजी हॉटेल यश ग्रँड येथे या सफाई कर्मचारी बांधवांचा सत्कार केला आणि त्यांच्या अथक मेहनतीबद्दल कौतुक व्यक्त केले.
तुमचं योगदान एसी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठं आहे असं म्हणत त्यांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या सेवेचं महत्त्व अधोरेखित केलं. सन्मान सोहळ्यानंतर भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
स्वच्छतेच्या सेवेला सलाम…
सफाई कर्मचारी बांधव आणि भगिनींनी आपल्या कामातून अहमदनगर शहराला स्वच्छतेचा आदर्श दिला आहे.