साक्षी दिनेश बोगा हिचा पद्मशाली स्नेहिता संघम अहमदनगर तर्फे सत्कार करण्यात आला.
अहमदनगर - न्यु आर्ट्स कॉलेजची साक्षी बोगा हीचा थलसेना कॅम्प (दिल्ली) मध्ये सहभाग..

न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय छात्र सेनेची’ छात्र सैनिक साक्षी बोगा हीने दिल्ली येथे झालेल्या थलसेना कॅम्प मध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रामचंद्र दरे साहेब यांनी संस्थेच्या वतीने तिचा सत्कार केला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, संस्थेचे विश्वस्त व कार्यकारिणी सदस्यांनी तीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, कला शाखेचे समन्वयक डॉ. किशन अंबाडे, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्रचार्या कल्पना दारकुंडे व महाविद्यालयाचे प्रबंधक श्री बबन साबळे उपस्थित होते.
दिल्ली येथे झालेल्या या कॅम्पचे आयोजन डी.जी.एन.सी.सी. मार्फत केले जाते. 17, महाराष्ट्र बटालियन अहमदनगर तर्फे तीची या कॅम्पसाठी निवड झाली होती. अतिशय खडतर असा हा कॅम्प तीने यशस्वीरित्या पूर्ण केला.
यासाठी तीला 17, महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर चेतन गुरुबक्ष, लेफ्ट. कर्नल रनदीप सिंग, लेफ्टनंट भरत होळकर, सुभेदार मेजर बाबासाहेब कचरे यांचे मार्गदर्शन लाभले.