ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रत्येक विद्यार्थ्याला काढावे लागणार ‘अपार’ कार्ड.. याचा नेमका उपयोग काय ? हा क्रमांक कसा मिळेल?

मुंबई

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिलॉकर’ हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित ‘डॉक्युमेंट वॉलेट’ तयार केले. शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ आणि मुख्य उद्देश आहे. यात अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात. डिजिलॉकरमधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार अधिकृत मानली गेली आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नदेशाच्या एकूणच शैक्षणिक परखतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत बदलापर्यंतचा हा मोठाच पट आहे. यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळखक्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.

‘अपार’ म्हणजे काय ?

‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार’. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक आहे. ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ म्हणजेच ‘यू-डायस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवलेला आहे. ‘अपार आयडी’ या ‘पीईएन’ची जागा घेणार आहे.

याचा नेमका उपयोग काय ?

प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि या डिजिलॉकरसाठी स्वतःचा स्वतंत्र ओळखक्रमांक असणे, हा ‘अपार’चा उद्देश आहे. शिक्षणासाठीची अधिकृत, मूळ कागदपत्रे या व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही. कारण डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

क्रमांक कसा मिळेल?

‘अपार’ ओळखक्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. ‘अपार’ साठी यू-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारकार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे ‘यू-डायस’ आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा अठरा वर्षांखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे. ‘अपार आयडी’ तयार झाला की तो डिजिलॉकरशी जोडला जाईल. याला ‘एज्युलॉकर’ म्हणूनही ओळखले जाते.

डिजिलॉकर काय आहे?

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिलॉकर’ हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित ‘डॉक्युमेंट वॉलेट’ तयार केले. शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ आणि मुख्य उद्देश आहे. यात अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात. डिजिलॉकरमधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार अधिकृत मानली गेली आहेत.

सद्यस्थिती काय ?

आत्तापर्यंत ३४ कोटी ‘अपार आयडीं’ची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रातही यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संगळी माहिती २० नोव्हेंबरपर्यंत संकलित करण्याच्या राज्यातील शाळांना सूचना होत्या. मात्र, दिवाळीच्या सुई आणि विधानसभा निवडणुकीमुळे या कामावर परिणाम होत आहे. ‘अपार’ ओळखक्रमांक हा डिजिलॉकरशी संबंधित असल्याने डिजिलॉकरविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आव्हान शैक्षणिक संस्थांपुढे, यंत्रणेपुढे आहे. शासकीय यंत्रणाच प्रसंगी डिजिलॉकर स्वीकारत नसल्याची उदाहरणे असल्याने केवळ ‘अपार’ क्रमांक तयार करून ही प्रक्रिया थांबणार की डिजिलॉकरचा पुरेपूर उपयोग होणार, हे दिसेलच.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे