
राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे. पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.