ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी..61 हजार कुटुंबांना दीड लाख रुपये मिळणार…

अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यासाठी 61,831 नवीन घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे.

ग्रामीण विकास यंत्रणेने प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट वाटप केले असून, लवकरच गावोगावी घरकुल बांधकामांना सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत लाभ मिळावा यासाठी पात्र लाभार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष येरेकर यांनी लाभार्थ्यांचे बँक तपशील आणि अन्य आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम आधीच केले होते.

यासाठी त्यांनी तालुकानिहाय दौरे करत आढावा घेतला होता. त्यामुळे घरकुलांचे उद्दिष्ट जाहीर होण्यापूर्वीच पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर नगर जिल्ह्यासाठी 61,831 घरकुले अधिकृतपणे मंजूर झाली आहेत.

नगर जिल्हा राज्यात क्रमांक 1 वर..

घरकुल मंजुरीच्या बाबतीत नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. CEO आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास यंत्रणेने 61 हजार घरांपैकी 50 हजार घरकुलांना मंजुरी देण्याचे काम प्राधान्यक्रमानुसार पूर्ण केले आहे. आधीच लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण असल्यामुळे ही मंजुरी प्रक्रिया जलद करण्यात आली.

वर्षभरात 82 हजार कुटुंबांना घर मिळणार ..

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्ह्यासाठी 21,700 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. यातील बहुतेक घरकुले बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आली आहेत किंवा काहींना तातडीने घरे मिळाली आहेत. आता 61 हजार नवीन घरकुले मिळाल्याने एकूण उद्दिष्ट 82 हजारांवर पोहोचले आहे, म्हणजेच 82 हजार कुटुंबांना वर्षभरात हक्काचे घर मिळणार आहे. बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थ्याला दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.

नाव यादीत नसेल तर 1 फेब्रुवारीपासून अर्ज करा ..

पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 साठी पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ज्यांची नावे यादीत समाविष्ट नाहीत त्यांनी 1 फेब्रुवारीपासून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवकांकडे अर्ज करावेत.सहायक अभियंता किरण साळवे यांनी स्पष्ट केले की, “सीईओंच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 ला गती मिळाली आहे. आता ज्यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी 1 फेब्रुवारीपासून आपल्या ग्रामपंचायतीत अर्ज करावेत.”

हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार..

राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या घरकुल योजनांमुळे नगर जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रशासनाने या योजनेला प्राधान्य देत जलद अंमलबजावणीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. लाभार्थ्यांनी आता कोणतीही विलंब न करता आपल्या अर्जांची पडताळणी करून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे. गावोगावी लवकरच घरकुलांचे काम सुरू होईल आणि नागरिकांना सुरक्षित आणि पक्की घरे मिळणार आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे