तारकपूरला सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये अवतरली पंढरी
अहमदनगर - टाळ मृदंगाच्या तालावर रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा

आषाढी एकादशी निमित्त अवघा महाराष्ट्र पंढरपूरच्या विठुराया चरणी लीन झाला. याच निमित्त तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य दिंडी सोहळा साजरा केला.
मेघाग्नी चौकातून या बाल वारकऱ्यांच्या दिंडीला सुरूवात झाली. वारकरी वेशभूषा, हातात भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे डाव सादर केले. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सुरेल टाळ वादन केले. शाळेत दिंडीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
शाळेत लेझीमचे डाव सादर झाल्यानंतर पूर्व प्राथमिकच्या चिमुरड्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. संत गोरा कुंभार यांच्या पांडुरंग भक्तीलरील नाटिकेने उपस्थितांचे डोळे पाणावले.
विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीची महती सांगून ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवला तसेच ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटिका सादर केल्या. शाळेच्या प्रांगणात पंढरपूर अवतरल्याची अनुभूती भक्तीमय वातावरणामुळे आली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद मेंघानी म्हणाले, कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन आजच्या सुंदर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडवले. आषाढी वारी, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे अध्यात्मिक वैभव आहे.
निस्सीम भक्ती, नाम स्मरणाचे महत्त्व वारीत अनुभवता येते. विद्यार्थ्यांनी हीच वैभवशाली परंपरा जपत दिंडी सोहळा साजरा केला. याकामी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सेक्रेटरी गोपाल भागवानी, खजिनदार दामोधर मखिजा, ट्रस्टी राजकुमार गुरनानी, सुरेश हिरानंदानी, हरेष मध्यान, प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कंचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी आदी उपस्थित होते.
प्रोग्राम हेड कांचन पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा कोटस्थाने, इशरत शेख यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब गुंजाळ , मनीष लांडे , शिरीन शेख , मनीष आहुजा , आशा रंगलानी , दिव्या पोखरणा , समिना शेख, रूचिता सारडा इतर सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका करिष्मा नवलानी, भावना ढाले, अश्विनी देशपांडे, अनामिका म्हस्के, नयन तुपे, बाळासाहेब पठारे आदींनी परिश्रम घेतले.