
संभाजीराजे छत्रपती यांचे विश्वासू समर्थक आणि स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख तसेच प्रवक्ते असलेल्या करण गायकर यांनी स्वराज्य पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा स्वीकारला असून, पक्ष संघटनेतून संपर्क प्रमुखपद बरखास्त करीत असल्याचा शेराही गायकर यांच्या राजीनामापत्रावर मारला आहे.
मराठा आरक्षणासह सुशासनासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पक्ष स्थापनेपासून संभाजीराजेंसोबत काम करणाऱ्या गायकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
याआधी स्वराज्यचे मराठवाडा सचिव राजेश मोरे, नाशिक जिल्हाप्रमुख आशीष हिरे, राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश शिंदे, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे यांना संघटनेचे निर्णय आणि आचारसंहिता डावलल्याच्या कारणावरून पदमुक्त करण्यात आले.
संपर्कप्रमुख असूनही विश्वासात न घेताच पदाधिकाऱ्यां बाबतचा निर्णय पक्षाने घेतला म्हणून नाराजी व्यक्त करत गायकर यांनी राजीनामा दिला. गायकर यांच्या पाठोपाठ हिरे यांनीही जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला असून, अन्य काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे.