
फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं.
याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पाइरेनीस ओरिएंटेल्स येथे एका किटकामध्ये आढळू आला होता.
मात्र याचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती अद्याप आढळून आलेली नाही.”