ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पत्रकार चौक ते डी एस पी चौक या तारकपूर मधून जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल…

अहमदनगर

पत्रकार चौक ते डी एस पी चौक या तारकपूर मधून जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी वाहतुकीत २६ जून ते १६ जुलै २०२४ पपर्यंत बदल.

दि. २४/०६/२०२४ रोजीपासून अहमदनगर शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये पत्रकार चौक ते एस.पी.ओ. चौकादरम्यान रस्याचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरु होणार आहे. सदर रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. रस्त्याचे काम चालु असताना अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते एस.पी.ओ. चौक या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे.

त्या अर्थी, मी राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर मला मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. २६/०६/२०२४ रोजीचे सकाळी ०६/०० वा. ते दि. १६/०७/२०२४ रोजीचे २०.०० वा. पावेतो पत्रकार चौकाकडुन एस.पी.ओ. चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश पारीत करीत आहे.

१) पत्रकार चौकाकडुन एस. पी. ओ. चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक / वाहनांसाठी मार्ग- छ. संभाजीनगर पुणे रोडला जाणारे वाहतुक/ वाहनांसाठी मार्ग-

* पत्रकार चौक- अप्पु हत्ती चौक-निलक्रांती चौक – दिल्ली गेट-मेहत्तर कॉलणी – नेप्ती नाका आयुर्वेदिक कॉर्नर-

जुना टिळक रोड/नवीन टिळक रोड-नगर पुणे हायवे मार्गे छ. संभाजीनगर रोड/ पुणे रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

— कल्याण रोडला जाणारी वाहने वाहतुक ही वरील मार्गे नेप्ती नाका कल्याण रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रस्तुतचा आदेश आज दि.२५/०६ / २०२४ रोजी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे