ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पाब्रेकिंगमहाराष्ट्र

जागतिक योग व संगीत दिन विशेष लेख

सौ.अनिता गुजर . राहणार डोंबिवली यांनी लेख लिहिलाय

जागतिक योग व संगीत दिनअसे म्हणतात की where words fail… Music speak खरंच जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलते.

वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे.

‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय.संगीत जीवनात आशा आणि सकारात्मकता भरते. संगीत ऐकल्याने शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही तणावमूक्त होता. संगीताच्या जादूने तुम्हाला आतून आनंदी वाटू लागते. संगीतामुळे मनाला उभारी येऊ शकते, संगीत उदास मनावर फुंकर घालू शकते, संगीतामधून मनातला कोलाहल व्यक्त करता येतो, संगीत दुःख गहिरे करू शकते.वेगवेगळ्या अभ्यासानुसार संगीताचं सामर्थ्य समोर आले आहे. ताणतणाव कमी करण्यात संगीताची मोठी मदत होते.

एका रिसर्चनुसार म्युझिक आपलं आरोग्य ठणठणीत राखण्यास काम करतं. म्युझिक आणि भावना यात एक वेगळंच आपुलकीचं नातं आहे.पण संगीताबरोबर अजून एक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी महत्वाची असते आणि ती म्हणजे योगसाधना. दिवसभराच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यायाम, योगासनांसाठीसुद्धा पुरेसा वेळ देता येत नाही. अशा वेळी केवळ नियमित ॐ’काराची साधना केली तर योगासनांचे सर्व फायदे मिळतात.

ॐ’कार , योगसाधना आणि मनःशांतीशी निगडीत संगीताचा संबंध येतो. योग आणि संगीत या दोन्हींना आपण साधना म्हणू शकतो कारण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी साधना करणे गरजेचे आहे. योग आणि संगीतातून शरीर आणि मनाला बळ मिळते, तसेच जीवन जगण्याची कला कळते. योग आणि संगीत या दोन्ही गोष्टी कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. कार्यक्षमता वाढावी आणि मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून संगीत ऐकावे आणि योगसाधना करावी.

योगासनं केल्यामुळे स्मरण शक्ती ही वाढते. योग हे एक जबरदस्त स्ट्रेस घालवायचे उत्तम साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुम्हाला खूप हलके वाटते. तुम्हाला आराम मिळतो आणि तुमच्या आनंदात भर पडते.

योगातील प्राणायाम या प्रकारात श्वासावर नियंत्रण करून लक्ष केंद्रित केले जाते. हाच प्रकार संगीतातील स्वर लावणे या प्रकाराशी मिळताजुळता आहे. योग्य जागी आणि योग्य तेवढा वेळ स्वर लावतानाही गायकाला श्वास नियंत्रित ठेवावा लागतो. दुसरे म्हणजे ॐ’कार हा प्रकार योगातही आहे आणि संगीतातही आहे, जशी प्राणायाम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी ओंकार लावला जातो, तसेच रियाज सुरू करण्याआधी गायक ओंकार म्हणतात.म्हणून या दोन्ही गोष्टीतून आपल्याला नक्कीच आत्मिक समाधान,शांती मिळते.

म्हणूनच तुम्हा सर्वांना जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनेक शुभेच्छा..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे