
आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिना निमित्त राघवेंद्र स्वामी शाळेत सहजयोग कार्यक्रम संपन्न.
प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहजयोग समितीच्या वतीने श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ संचलित श्री राघवेंद्र स्वामी विद्या निकेतन प्राथमिक व श्री देवेंद्रनाथ माध्यमिक विद्यालय, बोल्हेगाव या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकासाठी सहजयोग ध्यान साधना माहिती व कुंडलिनी शक्ति जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, मेजर कुंडलिक ढाकणे,मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलतांना मेजर कुंडलिक ढाकणे म्हणाले संपूर्ण जगात आज योग दिन साजरा करतात. वास्तविक भारत देशाला योगाचा प्राचीन परंपरा लाभलेला असून संपूर्ण जगाने भारताचे योगाचे अनुकरण केले आहे. योग म्हंटले की शारीरिक कवायती, प्राणायाम वगैरे असते परंतु सहजयोगा मध्ये कोणतीही शारीरिक कवायती नसून प्राणायाम सुद्धा नाही. निर्वीचारतेत ध्यान साधना केल्याने आंतरिक शांती व मानसिक संतुलन प्राप्त होते यासाठी आजच्या काळात प्रत्येक मानवाने सहजयोग ध्यान साधना करणे गरजेचे आहे.
या वेळी श्रीनिवास बोज्जा म्हणाले विद्यार्थ्या साठी सहजयोग ध्यान धारणा अत्यंत उपयुक्त असून ही ध्यान साधना केल्या मुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ति वाढून अभ्यासात प्रगती होते, या मधे कोणतीही अंध श्रद्धा नसून सत्यावर आधारित योग असून याची प्रचिती तक्क्षन येते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प. पु. माताजी श्री निर्मला देवी व राघवेंद्र स्वामी यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे सर यांनी केले. स्वागत श्री. डहाणे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री.भोईटे सर यांनी मानले.
या कार्यक्रमाचा लाभ 500-600 विदयार्थी व शिक्षकांनी घेतला.कार्यक्रमासाठी राहुल सातपुते, संदिप गांगर्डे, राहुल धोकरीया, अभय ठेंगणे, डाके सर , श्रीमती नायर, पुरणाळे, अकोलकर मॅडम,बेल्हेकर मॅडम, पवार, बर्डे मॅडम,दाणी सर, घोडके सर, चव्हाण मॅडम, पाटील मॅडम आदी उपस्थित होते.