ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉक्टरकीला पेशाला काळिमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

रामनवमीला संगमनेरमध्ये खळबळ.. शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात घडली घटना

रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवर समाज देवत्वाचा विश्वास ठेवतो. मात्र, संगमनेरमधील एका विकृत डॉक्टरने या पेशाला काळिमा फासला आहे..एका अल्पवयीन मुलीवर इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. डॉ. अमोल कर्पे यांनी उपचारासाठी दाखल झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आज (रविवार) पहाटे इंजेक्शन देऊन तीला रुग्णालयाच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

सकाळी पीडित मुलीने आपल्या चुलत्याला ही घटना सांगितली. संतप्त नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयाला घेराव घातला आणि कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. दरम्यान, डॉक्टर कर्पे रुग्णालयातून पळ काढण्यात यशस्वी झाले होते.

पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात डॉ. कर्पे यांच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत नाशिक येथून डॉक्टरला अटक केली आहे. घटनेनंतर रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही दवाखान्यासमोर जमले आणि त्यांनी संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी केली.

महत्वाचे म्हणजे, डॉ. कर्पे यांच्यावर याआधीही एका महिलेच्या बाबतीत बदनामीकारक आरोप झाले होते. मात्र, यानंतरही त्यांच्या विकृत वर्तनावर आळा बसला नाही, हे या नव्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

रामनवमीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात आनंदाचे वातावरण असताना समोर आलेल्या या अमानुष घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे