ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमधील दवाखान्यात घुसून टोळक्याची प्रसिद्ध डॉक्टरसह कुटुंबियांनाही बेदम मारहाण

अहमदनगर शहरात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. टोळक्यांची दहशत, मारहाणीच्या घटना ताजा असतानाच आता नगर सावेडी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून टोळक्याने डॉक्टरसह कुटुंबियांनाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या टोळक्याने इलेक्ट्रिक साहित्य, बेड व इतर बस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटर मधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्टरच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय ७३, रा. आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्यावर, झोपडी कॅन्टीन समोर, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोपड़ी कॅन्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड),घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले. त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करत हॉस्पिटलमधील बेड, इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केले. त्यानंतार ऑपरेशन थिएटरमधील मशिनरींची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉ. आठरे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच ५० लोक घेवून येवू आणि तुम्हाला उध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या टोळक्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टोळक्यांची वाढती दहशत

टोळक्यांची सध्या प्रचंड दहशत वाढली आहे. नगर शहरासहउपनगरात देखील टोळीयुद्धाच्या घटना घडत आहेत. या घटना नगरच्या सुरक्षेत बाधा निर्माण करणाऱ्या असून पोलिसांनी लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे