ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेची एकरकमी परतफेड योजना सुरू, जाणून घ्या सविस्तर

रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान, सात महिन्यांच्या कालावधीमध्ये सात जून अखेर बँकेच्या एकुण कर्जापैकी रुपये १६ कोटी ७० लाख वसूल करण्यात आले आहेत.

मात्र, थकीत कर्ज वसुलीला गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ५ जून २०२४ पासून सुरू करण्यात आली असल्याचे अवसायक तथा एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७२०० ठेवीदारांचे रुपये २९३.५७ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिझर्व्ह बँक) माध्यमातून परत करण्यात आले असून १५८५७ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झालेली असून त्यांचे रुपये ६१.८१ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिझर्व्ह बँक) माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.

या एकरकमी कर्ज परतफेड योजनेमुळे कर्जदार स्वतःहून मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी भरून आपले कर्ज खाते निल करण्याच्या दृष्टीने पुढे येतील, अशा विश्वास अवसायक गायकवाड यांनी व्यक्त केला.

या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज वसुली होऊन रक्कम ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

त्यामुळे सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत,असे आवाहन देखील अवसायक गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे