
वैशाख शु. ३, (अक्षयतृतीया) म्हणजेच दि. १० मे २०२४ रोजी जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच श्री श्री श्री जगदगुरु एकोरामाराध्य आणि चैत्र शुद्ध पंचमीला श्री श्री श्री जगदगुरु मरूळाराध्य यांचा प्रकट दिन अश्या त्रिवेणी संगमाचे औचित्त्य साधून “हिंदू वीरशैव लिंगायत मंच” या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने “महात्मा बसवेश्वर जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदु वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखे तर्फे पुणे शहरातील बाजीराव रास्ता, महाराणा प्रताप उद्यान येथे सकाळी ८:३० वा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी उद्योजक श्री. रविजी कल्याणे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहोळ्यात शंखनाद केलेले “केशव शंखनाद पथका” तर्फे १०० शंखांचा नाद करुन म. बसवेश्वरांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमास समाजातील विविध स्तरातून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या, तसेच प्रसिद्ध लेखिका डॉ. श्यामाताई घोणसे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष श्री मिलिंदभाऊ एकबोटे, विश्वेश्वर सह. बँकेचे अध्यक्ष श्री सुनील रुकारी, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, वीरशैव लिंगायत समाज पुणे शहर सचिव श्री किशोर कडेकर, श्री महेश कुगांवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.
हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे श्री शरद गंजीवाले, पुणे महानगर संयोजक श्री अतूल सरडे, एड. वैज्यनाथ विंचूरकर आणि मंचाचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली.