ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

थेट मोदीच्या सभेत झळकावले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक,पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात.

अहमदनगर - आपच्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि. 7 मे) झालेल्या सभेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जेल का जवाब वोट से ही पत्रके झळकावले.

पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना ही पत्रके भर सभेत स्टेजच्या समोर आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी झळकावले. यावेळी पोलीसांनी आघाव व शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवले.

यावेळी पोलीस स्टेशनला दिलीप घुले, गणेश मारवडे, राजेंद्र कर्डिले आदी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सभा संपल्यावर आपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे