ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री शंकर महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून कु.आर्या हिने पेन्सिलने महाराजांचे चित्र रेखाटले होते.
अहमदनगर

अहमदनगर येथील आपले समाज बांधव श्री अमोल गायकवाड यांची पुतणी आणि श्री. अतुल गायकवाड यांची सुकन्या कु. आर्या ( खुशी) हि इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून कु.आर्या हिने पेन्सिलने महाराजांचे चित्र रेखाटले होते. केडगाव येथील मठाचे गुरुवर्य श्री अशोक दादा जाधव यांनी तिचे तोंड भरून कौतुक केले. मंदिरात हे चित्र ठेवले होते ते पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
साळी समाजाला कु.आर्याचा अभिमान आहे तिचे अभिनंदन आणि तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी भगवान श्री जिव्हेश्वर चरणी प्रार्थना