देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे.