ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवाळीत एस.टी.चे ही भाडे वाढणार

अहमदनगर

दिवाळीच्या काळात एस.टी.च्या सर्वच बसच्या मूळ तिकिटावर सरसकट १० टक्के दरवाढ केली जाते. यातून महामंडळाला मोठे उत्पन्न मिळते. दरवर्षी ही दरवाढ केली जाते. यंदा मात्र अजून ती दरवाढ केलेली नाही.

दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाकडून सुमारे १० टक्के तात्पुरती दरवाढ जाहीर केली जाते. यंदाही ती जाहीर होईल. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ग्रामीण भागात व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाते, अशी माहिती एस.टी.च्या अधिकाऱ्यांकडून मिळाली.

दिवाळीच्या काळात एस.टी.च्या सर्वच बसच्या मूळ तिकिटावर सरसकट १० टक्के दरवाढ केली जाते. यातून महामंडळाला मोठे उत्पन्न मिळते. दरवर्षी ही दरवाढ केली जाते. यंदा मात्र अजून ती दरवाढ केलेली नाही.

पुढील आठवड्यात किंवा नोव्हेंबरमध्ये ती वाढ होऊ शकते. दरम्यान, दिवाळीच्या काळात एस.टी. बसला मोठी गर्दी असते. दरवाढ केली तरी दिवाळीच्या साधारण पंधरा दिवसांच्या काळात एस. टी. गर्दीने फुलून जाते. या काळात एस.टी.चे उत्पन्न कोट्यवधीने वाढते. ही गर्दी गृहीत धरून एस. टी. कडूनही फेऱ्यांची संख्या वाढविली जाते.

या महत्त्वाच्या मार्गांवर वाढणार बसेस

अहमदनगर-पुणे,अहमदनगर-मुंबई, अहमदनगर-कल्याण, अहमदनगर-नाशिक या महत्त्वाच्या मार्गासह छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या महत्त्वाच्या मार्गावर बसच्या फेया वाढविल्या जातात. याशिवाय ग्रामीण भागातील फेऱ्यांतही काही प्रमाणात वाढ केली जाते.

दिवाळी काळात गर्दी वाढणार

दिवाळीत शहरातील नोकरदार गावाकडे येतात. शिवाय ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी शहरात येतात. भाऊबीजेसाठी प्रवास करणायांची संख्या मोठी असते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते.

वाढीव फेऱ्यांचे होणार नियोजन

नगर जिल्ह्यातून धावणाच्या बस दिवाळीच्या कालावधीत वाढविण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता काही मार्गावरील बसेसच्या फेया वाढविण्याचेदेखील नियोजन आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढेल तर जिल्हांतर्गत बसेसच्या फेऱ्या वाढविल्या जाण्याचे नियोजन आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे