ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दोन हजारच्या नोटांना मुदतवाढ

दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत आज, शनिवारी संपणार असली तरी अद्याप तब्बल २४ हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या नसल्याचे स्पष्ट झाले.

या परिस्थितीत दोन हजारच्या नोटा परत करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे, असे शुक्रवारी सांगण्यात आले. ‘आरबीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अनिवासी भारतीयांनी नोटा जमा करण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे.

रिझर्व्ह बँकेने यंदा १९ मे रोजी दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा व्यवहारातून माघारी घेण्याची घोषणा केली होती. बँकेच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत ३ लाख ६२ हजार कोटी रुपये किंमतीच्या दोन हजारच्या नोटा चलनात होत्या.

१९ मेपर्यंत त्यांचे प्रमाण ३.५६ लाख कोटी, तर १ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार ३.३२ लाख कोटींच्या दोन हजारच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या. म्हणजेच सप्टेंबरपर्यंत एकूण ९३ टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत दाखल झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाहेर आहेत. रिझर्व्ह बँक दोन हजारच्या १०० टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली जाऊ शकते.

दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्याची विशिष्ट प्रणाली आहे. त्यासाठी बँकेत किंवा टपाल कार्यालयात जाऊन एक अर्ज भरावा लागतो. मग रांगेत उभे राहून एकावेळी फक्त २० हजारांपर्यंतच्या म्हणजे १० नोटा परत केल्या जाऊ शकतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे