ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवजन्मभूमीत शिवरायांचे सुवर्ण मंदिर, जगातील सर्वात मोठा पुतळाही उभारणार, शिवसेनेची घोषणा

पुणे

हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी देणारे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर. याच शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिर, महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व मागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली आहे.

आळेफाटा येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये सोनवणे यांनी ही घोषणा केली. यावेळी जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये २५ एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच २०० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून ८० मीटर उंचीचा स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार अशी माहिती यावेळी शरद सोनवणे यांनी दिली.

हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगाला शिवरायांच्या या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल असं यावेळी शरद सोनवणे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे