सीए सुनंदा राहूल रच्चा “STAR WOMEN OF WIRC” IIT अवॉर्ड ने मुंबईत सन्मानित
अहमदनगर

नुकतेच तेरापंथ भवन, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली इस्ट, मुंबई या ठिकाणी संपूर्ण पश्चिम भारतातील सर्व महिला सीएसाठी महिला दिन साजरा करण्यात आला. व यापैकी ५० महिला सीएंना ‘STAR WOMEN OF WIRC’ 2T1 अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
अहमदनगरमधील सीए सुनंदा स्च्या यांचीही या अवॉर्डसाठी निवड झाली सीए अंकित राही चेअरमन ऑफ WIRC यांच्या हस्ते हे अवॉर्ड मुंबईत देण्यात आले.
सीए सुनंदा सच्या या पद्मशाली समाजातील पहिल्या महिला सीए आहेत. RAD 4 Associates या सीए फर्मचे ते पार्टनर आहेत आणि ‘अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या सर्व शाखा शाळांचे ‘इंटर्नल मॉडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.
कामाबरोबर आपण आपले छंदही जोपासले पाहिजे, यामुळे आपल्याला काम करण्यासाठी जास्त ऊर्जा मिळते, असे सीए सुनंदा रच्चा यांना वाटते.
विविध नृत्य स्पर्धा, फॅशन शो मध्ये त्यांनी बरेच पारितोषीक जिंकले आहे त्यांना समाज कार्याची फार आवड आहे त्या महिला उद्योजकांसाठी सरक भारत सरकारच्या विविहार योजनांची, कर्जाची माहितीच्या कार्यशाळा घेत असतात.
Career Counselling शिवाय विद्यार्थ्यांना चे घडेही देत असतात.
अगदी १० महिन्या अगोदरच त्यांचे पती राहूल रच्चा यांचे आकस्मिक निधन झाले आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता. पण अशा परिस्थीतही परत एकदा स्वतःला सावरून हिमतीने आपल्या तिन्ही मुली व आपल्या पतीने पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करायचे, जिद्दीने त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली आपल्या सीएच्या पॅक्टिस बरोबर पतीच्या बिझनेस कडेही त्या लक्ष देत असतात.
फॅमिली आणि प्रोफेशनल यांची व्यवस्थीत सांगड घालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.
शिस्त वेळेचे पालन, सातत्य आणि आपल्या कामाप्रती आपली आवड यामुळे आपण हा एक अॅवॉर्ड जिंकला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या या यशात आपले मनोबल वाढवणारा आपला परिवार, मित्रमैत्रिणी व आपल्या तीन मुली (अवनी, अरोही मार्यशा) यांचा खारीचा वाटा आहे, असे ते म्हणतात.
एक जबाबदार महिला CA म्हणून WIRC of ICAI ने दिलेल “STAR WOMEN OF WIRCहा किताब आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. अशा या कर्तृत्ववान स्त्रीला आमचा मानामा मानाचा मुजरा.