ब्रेकिंगमहाराष्ट्र
नगरकर झालेत घामाघूम, तापमानाचा पारा 39.82 अंश सेल्सिअसवर

अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चेंजेस पाहायला मिळत आहेत. खरेतर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटेबरोबरच वादळी पावसाचे सावट पाहायला मिळाले होते.
दरम्यान, आता उन्हाळ्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती.
आता एप्रिल महिन्यातही असेच काहीसे घडतं आहे. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच वादळी पाऊस त्राहीमाम माजवत आहे. गेल्या मार्च महिन्यात नगर मधील तापमान 31 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.
दरम्यान, या चालू महिन्यात तापमानाने जवळपास 40°c चा टप्पा गाठला आहे. काल अर्थातच बुधवारी नगरमध्ये उच्चांकी 39.82 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 46 दिवसांनंतर काल दुपारी या विक्रमी तापमानाची नोंद झाली.