ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अमोल दिगंबर कोंडा यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश म्हणजे पद्मशाली समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा नारायण मंगलारम

अहमदनगर - श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी व पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने कोंडा यांचा सत्कार संपन्न

“केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही जगातील सर्वात अवघड परीक्षा पैकी एक आहे अश्या परीक्षेत घरात वडिलांच्या रूपाने प्रशासकीय व सामाजिक कार्याचा असलेला वारसा घेऊन अमोल दिगंबर कोंडा यांनी मिळवलेले यश म्हणजे पद्मशाली समाज व नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.

अमोल यांनी आपले हे यश आपल्या पुरते मर्यादित न ठेवता समाजातील व शहरातील होतकरू तरुणांना ही मार्गदर्शन करावे….!!” असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले. अहमदनगर महानगर पालिकेचे माजी उपयुक्त दिगंबर कोंडा यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमोल यांची नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विमान उड्डाण अधिकारी पदावर निवड झाल्या बद्दल श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी व पद्मशाली समाज बांधव यांच्या वतीने श्री मार्कंडेय मंदिरम येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानाचा फेटा देऊन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल, सचिव कुमार आडेप व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

दिगंबर कोंडा यांनी अहमदनगर शहराच्या प्रशासनासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक व आध्यत्मिक कार्यात अग्रेसर काम केले आहे. त्यांचा हाच वारसा पुढे चालवत त्यांचे चिरंजीव अमोल यांनी सिव्हील एव्हियेशन सारख्या वेगळ्या क्षेत्रात करियर करताना भारतातली अग्रगण्य विमान कंपन्यांसोबत काम केल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या अवघड परीक्षेत मिळवलेले यश म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे.…!!” असे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम म्हणाले.

“वडील आणि आजोबांचा वेगळी वाट चोखळन्याची परंपरा कायम राखत अमोल यांनी मिळवलेले यश आणि ते आपल्या समाज बांधवांचे यश, ही अभिमानाची बाब आहे. दर गुरुवारी गजानन महाराज आरती व महाप्रसादानंतर आपल्याला आपल्या कर्तृत्ववान समाज बांधवांचा सत्कार करण्याची संधी मिळतेय ही श्री मार्कंडेय महामुनींची कृपा आणि आपल्या बांधवांच्या मेहनतीचे फळ आहे…!!” असे प्रस्ताविकात श्रीनिवास एल्लाराम सर म्हणाले. तर, ” आजोबांची प्रेरणा व वडिलांच्या मार्गदर्शनासोबत जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या मदतीने मी या परीक्षेत यश मिळवू शकलो. प्रामाणिक प्रयत्नाने नक्कीच मधुर फळ मिळते. श्री मार्कंडेय महामुनिंच्या साक्षीने समाज बांधवांच्या वतीने झालेला हा सन्मान मला अजून काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा देईल ….!!” असे सत्काराला उत्तर देतांना अमोल कोंडा म्हणाले.

सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लाराम यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमार आडेप यांनी केले. यावेळी दत्तात्रय जोग,लक्ष्मण इगे, रघुनाथ गजेंगी, शंकर नक्का, शिवाजी संदूपटला, भीमराज शिरसुल, रमाकांत बिज्जा,रमेश भूसा, शेखर दिकोंडा, विनायक बत्तीन, कृष्णा संभार, हनुमान म्याकल, हनुमंत जोग,विजय येनगंदुल, ऋषिकेश गुंडला, श्रीनिवास वंगारी, सागर सबबन, विठ्ठल गुंडू, नितीन गाली, ज्योती गाली, व्यंकटेश नक्का, श्रीनिवास एल्लाराम, शुभम सुंकी, दत्तात्रय अडगटला, बालकिसन आकुल आदींसह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे