ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्रमिक बालाजी मंदिर येथे श्री राम जन्म निमित्त अखंड हरीनाम सप्ताहला सुरुवात

अहमदनगर

श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था, श्रमिकनगर च्या वतीने श्री राम जन्म निमित्त अखंड हरीनाम साप्ताह चे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, श्रमिक हौसिंग सोसा चे चेअरमन विलास सग्गम व सोसा चे सेक्रेटरी शंकरराव येमूल यांचे हस्ते झाले .

या वेळी ह. भ. प. मिलिंद महाराज पतंगे, नल्लास्वामी महाराज, मंचे पुरोहित, संस्थेचे अध्यक्ष विनोद म्याना आदी उपस्थित होते.

या वेळी अखंड हरीनाम सप्ताह निमित्त नगरसेवक मनोज दुलम यांचे हस्ते ध्वजा रोहन करण्यात येऊन कळस पूजा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व सोसा चे चेअरमन विलास सग्गम यांचे हस्ते करण्यात येऊन आरती करण्यात आली व ज्ञानेश्वरी पठण ला उपस्थित महिलांनी सुरुवात केली.

सदरचे सप्ताह दिनांक 11 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत चालू राहील रोज सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्वरी पठण, दुपारी 3 ते 5 भजन, सायंकाळी 5 ते 6 विविध महाराजांचे प्रवचन व रात्री 8 ते 10 विविध महाराजांचे कीर्तन होईल व शेवटच्या दिवशी दिनांक 18 एप्रिल ला सकाळी 10 ते 12 वा. ह भ प श्री जनार्धन महाराज माळवदे यांचे काल्याचे कीर्तन होऊन त्या नंतर संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. असून सदरहू सर्व कार्यक्रमाचा लाभ सावेडी उपनगरातील भाविकांनी घ्यावे असे आवाहन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद म्याना यांनी केले.

या सप्ताह साठी सेवा देणाऱ्या भाविक भक्तांसाठी रोज सकाळी अल्पोपहार व रात्री भोजनाचे आयोजन अन्नदात्यांनी केले आहे. सदरहू सप्ताह यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे