ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा खंडणीसाठी खून

पुणे

पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्याच मित्रांवर विधान ठेवणं एका तरुणीच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच त्या विद्यार्थीनीचे अपहरण करून तिच्या घरी नऊ लाखांची खंडणी देण्याचा मेसेज केले. त्यानंतर चिंतातूर झालेल्या तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकरण समोर आले. त्या विद्यार्थिनीच्या मित्रांनीच तिचे अपहरण करुन खून केला होता. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.या प्रकरणी तिच्या तीन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील विमान नगर परिसरातील फिनिक्स मॉलमधून बाहेर आल्यानंतर ती तरुणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या मित्रांसोबत गेली होती. शिवम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. हे तिघे मराठवड्यातील आहेत. जाधव आणि इंदूरे हे शिवमचे मित्र आहेत.

त्यांनी भाग्यश्रीचा खून केल्याची कबुली दिली. ज्या दिवशी भाग्यश्रीचे अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुण्याजवळील सुपा येथे जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे त्यांनी कबुल केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे