ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निर्मला धाम आरडगाव राहुरी येथे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

राहुरी

प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबई संचलित निर्मला धाम आरडगाव ता. राहुरी, जि. अहमदनगरच्या वतीने इ.8 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांना विनामूल्य भव्य करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजत केले असल्याचे मा. व्यवस्थापक व सर्व कार्यकारिणी समिती निर्मलधाम आरडगाव यांच्या वतीने करण्यात आले.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार कुठे प्रवेश घ्यावा नवीन शैक्षणिक धोरणानुसार पालकांनी काय पूर्वतयारी करावी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या याबाबत अनेक पालकांच्या मनात संभ्रम आणि ताणतणाव असतो, तो दूर होऊन योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आहे जे फक्त मोठ्या शहरात व ठराविक रक्कम खर्च करून मिळवावे लागते त्यासाठी पालकांचे वेळ आणि पैसा वाया जातो.

यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी भव्य असे करियर मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेआठ ते अडीच या वेळेत आयोजित केले आहे

यासाठी पुणे मुंबई व श्रीरामपूर येथील तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांचे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन विनामूल्य स्वरूपात आयोजित केले आहे.

तरी सर्व गरजू ग्रामीण व शहरातील सर्व विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. व्यवस्थापक व सर्व कार्यकारणी समिती निर्मला धाम आरडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे