बोज्जा परिवाराने घातला आदर्शवत नवा पायंडा
भावनापूर्ण कवितांनी स्व. सुरेश बोज्जा (कारभारी )यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न

स्व. सुरेश रामय्या बोज्जा (कारभारी) यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त बोज्जा परिवाराने आयोजित केलेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवींनी वडिलांची महती सांगणा-या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
बापाच्या दुःख, वेदना ऐकून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके होते. संमेलनाचे उदघाटन अहमदनगर शहराचे आ. संग्राम जगताप, भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौन्दर, राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर, भाजपा नेते वसंत लोढा, नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक किशोर डागवाले, संपत नलवडे, समता परिषदेचे अध्यक्ष दत्ता जाधव, मेडिकल असोसिएशनचे दत्ता गाडळकर, सामाजिक कार्यकर्ते , बाळासाहेब बारस्कर, उदय कराळे, शहर बँकेचे संचालक अशोक कानडे,श्री मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, फटाका व्यापारी असो चे अध्यक्ष सुरेश जाधव, गणेश परभणे दै. लोक आवाजचे संपादक लांडगे, दै. पुढारी चे संपादक संदीप रोडे, राजेंद्र उदागे, माजी नगरसेविका वीणा बोज्जा, पद्माशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते झाले.
या वेळी प्रसिद्ध कवी वसंत डंबाळे (औरंगाबाद), प्रकाश घोडके, (पुणे), शर्मिला गोसावी, प्रा. सीताराम काकडे, डॉ. सूर्यकांत वरकड, दीपक रोकडे, शाहीर भारत गाडेकर, शाहीर अरूण आहेर, कानडे यांच्या भावपूर्ण कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वेळी गायक संतोष पानसरे, गणेश घबाडे व विनय गुंदेचा यांनी गाणे सादर करून वातावरण भावनिक केले.
या वेळी समाजात समर्पित सेवाभावाने कार्य करणारे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल गोरे, डॉ. प्रा. अशोक काळे, श्रीमती सविता जोशी, श्याम दत्तात्रय सदावर्ते, किसन व्यँकटी बोमादंडी, भूमय्या लक्ष्मन बोगा, श्रीमती लक्ष्मीबाई किष्टय्या बिटला, नरसय्या चंद्रय्या नल्ला, शंकर राजन्ना द्यावनपेल्ली, सुरेश अच्युतराव क्षीरसागर, गोरक्षनाथ विठ्ठलराव विघ्ने, रमेश गोटू कांडीवकर,सतीश प्रभाकर डेरेकर व प्रमोद दत्तात्रय कांड यांचा पाहूण्याचे हस्ते सन्मान करण्यात आले.
या वेळी स्व. सुरेश बोज्जा यांच्या कार्याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. या वेळी बोज्जा कुटुंबियांतील सदस्य व इतर नागरिकांनी स्व. सुरेश बोज्जा यांच्या आठवणी व कार्याबाबत गौरवउल्लेख केला. या कर्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सूत्रसंचालन कवी व पत्रकार डॉ. सूर्यकांत वरकड यांनी केले. स्वागत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, यांनी केले तर, आभार अनिता मुत्याल व संदीप मुत्याल यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बोज्जा परिवारातील सदस्य विजय बोज्जा, संतोष बोज्जा, मनोज बोज्जा, विनायक बोज्जा, रवी बोज्जा, रितेश बोज्जा, अथर्व बोज्जा, अवनीश मुत्याल, ओम जव्हेरी, पूर्वजा बोज्जा व संस्कृती मुत्याल यांनी परिश्रम घेतले.