शिवजन्म सोहळ्यायानिमित्त १९४ रक्तदात्यास “ब्ल्यूटूथ इयरबर्ड्सचे” वाटप
पुणे

सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही तिथीनुसार दि. २८ मार्च २०२४ रोजी शिवराज्य प्रतिष्ठाण, छत्रपति शिवाजी महाराज रोड, पुणे तर्फे शिवजन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता.
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आम्हा सर्व शिवभक्तांसाठी एक मोठा सणच असतो ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत असतो, यंदा प्रतिष्ठानचे हे १७ वे वर्ष आहे आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतो,
प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. अत्तापर्यंत शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४५०० पेक्षा जास्त रक्तपिशव्याचे संकलन करण्यात आलेले आहे तसेच वेळोवेळी गरजूंना मदत देखिल करण्यात आली आहे.
सकाळी ७:३० वा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास प्रारंभ झाला, जवळ जवळ १९४ रक्तदात्यांनी या रक्तदानात सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास भेटवस्तू स्वरूपात आपण “ब्ल्यूटूथ इयरबर्ड्सचे” वाटप केले.
तसेच दुपारी १२ वा शिवजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला, यामध्ये प्रतिष्ठाणच्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी पेढे वाटून शिवजन्म साजरा केला. तसेच सायं ७ वाजता बाल-शिवभक्तांसाठी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आणि नंतर बालमेलवा आणि अल्पोपहार करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी आवर्जून उपस्थित राहून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच सर्वश्री मा नगरसेवक मनोजसाहेब देशपांडे, अजय खेडेकर, विष्णुआप्पा हरीहर, हेमांतजी रासने, राजेंद्र काकडे, दिलीप काळोखे, माजी महापौर कमलताई व्यवहारे, बाप्पू नाईक, सामाजिक कार्यकर्ते सौरभ बाळासाहेब अमराळे, सतीश मोहोळ आदी मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष लतिश शिंदे, उपाध्यक्ष प्रसाद तेलंग, कार्याध्यक्ष आशिष हिंगमिरे, प्रशांत मोरे, राहुल फटाले, अविनाश करंजावणे या प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.