ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

पदाच्या माध्यमातून समाज हिताचे काम करावे – भैय्या गंधे

अहमदनगर

भारतीय जनता महिला मोर्चा सरचिटणीस पदी श्वेता पंधाडे झोंड यांची नियुक्ती.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी सौ.श्वेताताई पंधाडे झोंड यांची निवड झाल्या बद्दल त्यांनी विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी ताईंचा आदरसत्कार करण्यात आला,तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन महिला सक्षमिकरणा साठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पक्षाच्या माध्यमातून श्वेताताई विविध जनहिताच्या योजना राबवत असतात.या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे