ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी दीड लाख नागरिक उपस्थित राहणार

शिर्डी - 26 ऑक्टोबरला शिर्डीत आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमासाठी उच्चांकी गर्दी जमवली जाणार आहे. किमान 1 ते 1.5 लाख नागरिकांची उपस्थिती असेल.

विविध योजनांच्या 35 ते 40 हजार लाभार्थ्यांना शिर्डीत आणले जाणार आहे. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून त्याची जबाबदारी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांवर सोपवली गेली असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे.

यापार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेत कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून सूचना केल्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इतर जिल्ह्यांच्या तुलनेते सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला. त्याप्रमाणेच या कार्यक्रमाचेही सुक्ष्म नियोजन करण्यात येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे