ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुर्यनगर येथील रस्त्याचा प्रश्न खा. विखे यांच्यामुळे मार्गी

अहमदनगर

अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नाने व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील सूर्यनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

या कार्यक्रमास आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेविका रुपाली वारे, पल्लवी जाधव, सभागृहनेते विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अविनाश घुले, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे