ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुषार कपूर चित्रपटातून ओटीटी मध्ये पदार्पण करणार
गेले काही महिने तो अभिनयापासून दूर होता मात्र आता तो पुन्हा अभिनयाकडे वळत आहे.

अभिनेता तुषार कपूरने अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मितीही केली आहे.अभिनेता तुषार कपूरने अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्याच्या काही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.
निर्मात्या प्रेरणा अरोरा हिचा ओटीटी चित्रपट ‘डंक-वन्स बिटन ट्विस शाय’ मध्ये मुख्य भूमिका तो साकारणार आहे. अजिंक्य नावाच्या वकिलाची भूमिका तो करत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
‘डंक’ या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न मांडण्यात आला आहे. उत्तम कथानक आणि सामाजिक संदेश असणारा हा चित्रपट आहे. तुषार कपूर व्यतिरिक्त निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आदी प्रमुख भूमिकेत आहेत.