ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जनतेचा कौल की, ई व्ही एम चा खेळ, आमची मते गेली कुठे – मा.नगरसेविका वीणा बोज्जा

अहिल्यानगर

नगर प्रभाग क्रमांक 6 क मधून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असून या प्रभागाचे भाजपा चे उमेदवार ऐनवेळी दिलेले असून हे उमेदवार वयोवृद्ध यांना प्रभागाची कोणतीही माहिती नाही, प्रभागातील मतदारा पर्यंत पोहचले नाही तरी या विजयी कश्या झालेत असा प्रश्न वीणा बोज्जा यांनी केला आहे.

प्रभाग क्रमांक 6 मधील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक बोळीत व प्रत्येक घरात मला अभूतपूर्व प्रतिसाद असताना प्रभागात अपक्ष उमेदवार निवडून येईल असे सगळीकडे चर्चा असताना ई व्ही एम मधून बाहेर आलेली आकडे वेगळेच दाखवत आहेत, नक्की या उमेदवाराने केले काय, ना वार्डात फिरले ना मतदान केंद्रावर थांबले, ना कोणाला मतदान मागितले असे असताना हे उमेदवार निवडून आलेच कसे हा मोठा प्रश्न या प्रभागात निर्माण झालेला आहे.

उलट प्रभागामध्ये भाजपा उमेदवार तीन नंबर ला जाईल अपक्ष व तुतारी मध्ये लढत होईल असे सांगण्यात येत होते असे असताना अचानक इतक्या लीड ने भाजपा उमेदवार कशी निवडून आली हे कळेनासे झाले आहे.

मतदानाचे दिवशी या उमेदवाराचे बूथ वर मतदार विचारायला येत नाही, प्रतिसाद मिळत नाही म्हणून सेंट मोनिका चे बूथ दुपारीच काढून टाकले तर श्रमिक नगर बूथवरही हे उमेदवार कुठेही दिसून आले नाही, असे असताना यांचा प्रचार अदृश्य स्वरूपात झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व परिस्थिती वरून मतदारावर शंका घेता येणार नाही, मतदार मत दिले वर सुद्धा येऊन सांगत होते मग असे असताना ही मते गेली कुठे? अशी कोणती जादू झाली की ज्या उमेदवाराला प्रभागातील 70% मतदार ओळखत नाही त्या उमेदवाराला मते कसे पडतील हे सर्व अकलनीय आहे.

या सर्व गोष्टी वरून एक गोष्ट निश्चित होते जर मशीनच सेटअप केले तर तुम्हाला कुठे ही प्रचार करावयाची गरज नाही, किंवा मतदाराकडे हात जोडायची गरज नाही. असे प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणे होय, या सम्पूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गैरजेचे आहे अशी मागणी मा. नगरसेविका वीणा बोज्जा यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे