
अहमदनगर मध्ये लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांना ती चा सन्मान सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला आहे.
ती चा सन्मान सोहळा म्हणजे स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व, स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ. तुमच्या कतृत्वाला, दातृत्वाला, नेतृत्वाला आणि अस्तित्वाला आमच्या सर्वांचा सलाम.
या कार्यक्रमासाठी आपल्या कार्याने जगभरात आपल्या देशाचे, शहराचे नाव उंच शिखरावर नेणाऱ्या ती चा सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील विशेष महिलांच्या कार्या चे प्रस्ताव मागविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जवळ जवळ १०० महिलांनी सहभाग नोंदविला आहे.
हा कार्यक्रम सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे -Z मराठी वरील फेमस सिरियल – तुला पाहते रे. यांचा हस्ते पुरस्कार वितरण सोहळा तसेच महिला मान्यवरांच्या उपस्थितीत – मा. सौ. धनश्री ताई सुजयदादा विखे पाटील अध्यक्ष सिंधू ताई ए. विखे पाटील रणरागिणी महिला मंडळ, अहमदनगर.मा. सौ. डॉ. सुधा कांकरिया अध्यक्षा बेटी बचाव अभियान अहमदनगर.मा.सौ. भावना तिवारी महिला आघाडी सोशल वर्कर – जिल्हा – मुंबई.मा. सौ. निलांबरी भट प्रोफेशनल कंटेंट राईटर, ब्लॉगर, ब्लॉगर – जिल्हा – सांगली.मा.सौ. मधुरा वैद्य – झावरे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर.कु. अंजली व नंदिनी गायकवाड इंडियन आयडॉल विजेते , सौ. गौरी कुलकर्णी – आर के फर्निचर ,
तसेच अहमदनगर मधील प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम दिनांक १० मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय स्वस्तिक चौक अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. त्या सोबत च वेगळे वेगळे फूड स्टॉल आणि इतर ही स्टाॅल असणार आहे.
सर्व अहमदनगर मधील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन बोज्जा यांनी केले आहे.