ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ मंजूर करण्यात आले आहे.

यासाठी महानगरपालिकेने नाशिक येथील दिग्विजय एंटरप्रायजेस या खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून वाहतुकीची, पार्किंगची समस्या मार्गी लागेल, वाहतुकीला शिस्त येईल व महानगरपालिकेलाही उत्पन्न मिळेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला..

महानगरपालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पार्कींग झोन, नो हॉकर्स झोन, सम विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्क आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.

यात १८ प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन करण्यात आले आहेत. तर कापड बाजार व नवीपेठ रस्त्यावर एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली आहे. खासगी संस्थेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेलाही सम विषम पार्किंग, नो पार्किंग झोनच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

शहरात लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय, बेलदार गल्ली, चांद सुलताना विद्यालय समोरील रस्ता, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, मंगल गेट मटन मार्केट समोरील जागा, नेहरू मार्केट मोकळी जागा, वस्तू संग्राहलय, नोबल हॉस्पिटल लगतचा रस्ता, जुने सिव्हील हॉस्पिटल, लाल टाकीरस्ता अप्पू हत्ती चौक ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते झेडपी क्वार्टरलगत, पोलिस लाईनलगत, बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौक ते नायरा पेट्रोल पंप, सातभाई मळा, सावेडी जॉगिंग ट्रॅक १, सावेडी जॉगिंग ट्रॅक २, मिसगर विद्यालयमागे, वाडिया पार्क मधील दक्षिणेकडील गेट जवळील जागा, एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता, इमारत कंपनी, अमरधाम पश्चिमेकडील कम्पौंड जवळील जागा, मानकर गल्ली, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा रस्ता, पांजरपोळ मोकळी जागा (मार्केटयार्ड चौक), पाईपलाईन रस्ता, पुणे बस स्थानकाजवळ, नेताजी सुभाषचंद्र चौक ते नवी पेठ शहर सहकारी बँकपर्यंत, कोठी रस्ता ते यश पलेस हॉटेल, भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, प्रोफेसर चौक ते प्रेमदान हॉटेल चौक, नवीन कलेक्टर ऑफिस रोड, सेंट आण्णा चर्च रोड, बंगाल चौकी, चायना मार्केट, सहकार सभागृह रोड, सावित्रीबाई फुले संकुल (आकाशवाणी केंद्राशेजारी) या ३६ ठिकाणी पे अँड पार्क करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे