ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जनजाती कल्याण आश्रमच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद पारगावकर यांची नियुक्ती..

अहिल्यानगर

संघ परिवारातील जनजाती कल्याण आश्रम अहिल्यानगर शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.यानिमित्ताने नव्या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार व स्नेहमेळाव्याचे आयोजन आयुर्वेद व्यासपीठाच्या सभागृहात झाले.

यावेळी जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके यांच्या हस्ते स्नेहमेळाव्याचं उद्घाटन होऊन नूतन अध्यक्ष अरविंद पारगावकर व नूतन सचिव अनंत फंड यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रा.स्व. संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी, प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राजाभाऊ मुळे, मावळते अध्यक्ष महेंद्र जाखेटे व मावळते सचिव डॉ. निळकंठ ठाकरे आदी उपस्थित होते.

विशारद पेटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. रोहिणी शिवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत आपटे यांनी नगर जिल्हा कार्यालयासाठी एक फ्लॅट देत असल्याचे जाहीर केले. मिलिंद मुळे यांनी आभार मानले.

यावेळी अनेक जुने कार्यकर्ते, देणगीदार, हितचिंतक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे