
गणेशोत्सवाच्या तोंडावर मागणी वाढल्याने डाळींच्या किंमतीत दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तूरडाळ १७० रुपयांवर पोहोचली असताना, चणाडाळीने ८० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.
नवरात्रोत्सवापर्यंत मागणी आणखी वाढून दरवाढ होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे सण साजरा करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार असे चित्र आहे.
काही ठिकाणी भरपूर तर काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. यामुळे डाळींच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामुळे सरकारने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गरज पडल्यास हस्तक्षेप करावा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.