पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे महिलादिना निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न.
अहमदनगर

अहमदनगर मधील पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे महिला दिनानिमित फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आला होता. यामध्ये जवळ जवळ १५ – २० महिलांनी सहभाग घेतला होता. महिला नेहमी आपल्या मुला-मुलीसाठी फॅन्सी ड्रेस शाळेसाठी करीत असतात.
आता आपण स्वत: फॅन्सी ड्रेस करण्याच्या कल्पनेने सगळ्या आनंदून गेल्या. आणि मनापासून सर्व महिला सहभागी झाल्या.
अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांच्या प्रेरणेने स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रत्ना बल्लाळ यांनी केले.
सुत्रसंचलन सचिव सपना छींदम यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण स्नेहा वन्नम आणि श्वेता गुंडू यांनी केले. आभार निर्मला गुंडू यांनी मानले.
या प्रसंगी निर्मला गुंडू यांच्या तर्फे पाणी पुरी चा बेत केला. सर्व महिलांनी मनसोक्त पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी डॉ.रत्ना बल्लाळ यांनी ‘मीराबाई, विजया गुंडू यांनी ‘इंदिरा गांधी प्रमिला वन्नम , माजी महाराष्ट्रीयन स्त्री, सीमा अंकाराम यांनी “वारकरी स्त्री, अनिता कोंडा यांनी द्रौपदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, नीता बुरा यांनी सावित्रीबाई फुले तर रोहिणी पागा यांनी सरोजनी नायडू, पूजा म्याना यांनी धक धक गर्ल माधुरी दिक्षित, कांचन कुंटला यांनी ‘साऊथ इंडियन लुक’ सचिव सपना छिंदम यांनी ‘मल्टी टास्क वूमन, लक्ष्मी गुंडू यांनी ‘ब्लड- डोनेशन’ निलिमा अडगटला यांनी गुजराती दडिंया लुटला.
अशा विविध वेशभूषा करून सर्व महिलांनी आनंद लुटला..