महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य प्रतिनिधी म्हणून शिक्षिका श्रीमती मीनाक्षीताई अवचरे यांची निवड
नेवासा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य प्रतिनिधी म्हणून नेवासा फाटा मुकींदपूर येथील कडा कॉलनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती मीनाक्षीताई अवचरे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गुरूमाऊली मंडळाचे नेते व सर्वे सर्वा बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्य संघातील महत्वाची पदे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देण्याचा निर्णय घेतला. गुरू माऊली मंडळाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी आजपर्यंत मोलाची साथ दिली अशा सर्व सहकाऱ्यांना त्यांनी योग्य ठिकाणी नियुक्त्या मिळाल्या
यामध्ये विशेषतः महिला प्रतिनिधी म्हणून गुरूमाऊली महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ज्यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली अशा श्रीमती मीनाक्षीताई अवचरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यात काम करण्यासाठी राज्य महिला प्रतिनिधी या पदावर पदोन्नती द्वारे राज्य संघाचे प्रतिनिधी म्हणून निवडीद्वारे संधी देण्यात आली आहे.
श्रीमती मीनाक्षीताई अवचरे यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.